सावदा येथील पत्रकारावरील झालेल्या हिंसक हल्ल्याचा निषेध

0
62

सावदा प्रतिनिधी

जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील पत्रकार फरीद शेख यांच्यावर गोवंश वाहतूक करणाऱ्या कडून करण्यात आलेल्या हिंसक हल्ल्याचा आज दि.१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी सावदा येथील शासकीय विश्रामगृह ठिकाणी रावेर-यावल तालुक्यातील पत्रकारांनी तापी सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक रित्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.व झालेल्या हल्ल्याची योग्यती दिशा ठरवण्यात आली.तरी यापुढे सदर प्रकारे पत्रकारांवर हल्ले झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचा लढा देण्यात येईल असे देखील सर्वानुमते ठरवण्यात आले.या निषेध बैठक प्रसंगी लेवा जगतचे संपादक श्याम पाटील,संघटनेचे कार्याध्यक्ष पंकज पाटील फारुक शेख,युसूफ शाह,दिलीप चांदेलकर, जितेंद्र कुलकर्णी,कमलाकर पाटील,दिलीप भारंबे,प्रवीण पाटील ,राजू दिपके,भारत हीवरे,लक्ष्मण ठाकूर सर,रवींद्र हिवरकर,विनोद कोळी,प्रमोद कोंडे,प्रा.उमाकांत पाटील,सुमित पाटील,प्रकाश पाटील,भीमराव कोचुरे,विजय अवसरमल,संतोष नवले,योगेश सैतवाल, वि.के.अवसरमल, प्रदीप महाराज,विनायक जहुरे, भूषण सोनवणे,पुरुषोत्तम संगपाळ,आशिष चौधरी,महेंद्र पाटील,सह रावेर यावल तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here