जळगाव : प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यात सुरुवातीला गोंधळ गीत, शौर्यनृत्य, दांडपट्टा व कवायतींचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमात सादर करण्यात आले.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यातर्फे सोमवारी शिवतीर्थ मैदानात शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने शिवजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, करीम सालार, मुकुंद सपकाळे यांनी मार्गदर्शन केले.
अनिता चौधरी यांच्या शिष्यांनी शौर्यगीत, शेखर कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी यांनी दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, प्रतिभा शिरसाठ, अनंत जोशी, पुरुषोत्तम चौधरी, सुरेंद्र पाटील, विनोद देशमुख उपस्थित होते. शंभू पाटील यांनी सूत्रसंचालन
केले.
