साने गुरूजींच्या कवितेमधुन मानवतावाद धर्माचा सार – डॉ. संजय गोपाळ

0
24

साईमत जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत पूज्य साने गुरूजी संस्कार केंद्राच्यावतीने ‘साने गुरूजीच्या दृष्टीकोनातून मानवतावाद’ या विषयावर डॉ. संजय गोपाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

डॉ. गोपाळ यांनी आपल्या व्याख्यानात साने गुरूजींचे जीवन ख-या अर्थाने मानवतावाद व समतेवर आधारित होते. साने गुरूजींच्या ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या कवितेमधुन मानवतावाद धर्माचा सार असल्याचे त्यांनी सांगितले. साने गुरूजींनी सत्याग्रह तसेच अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंचावर डॉ. संजय गोपाळ, गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर चौधरी, विचारधारा प्रशाळेचे प्र. संचालक प्रा. म. सु. पगारे, गणित विभागप्रमुख प्रा. किशोर पवार, केंद्राचे विभागप्रमुख प्रा. मनोज पाटील उपस्थित होते.

प्रा. पगारे यांनी अध्यक्षीय समारोप करतांना सांगितले की, साने गुरूजींचे ‘आता उठवू सारे रान’ या कवितेचा संदर्भ देवून अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी सर्वांनी एकरूपतेने संघर्ष करावा. पूज्य साने गुरूजी जयंतीचे औचित्य साधुन हे व्याख्यान गणितशास्त्र प्रशाळेच्या रामानुजन सभागृहात आयोजित करण्यात आले. सुत्रसंचालन गौरव हरताळे यांनी केले. यावेळी प्रा. आशुतोष पाटील व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here