सागर पार्क परिसरातून दुचाकी लांबविली

0
17

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सागर पार्क मैदानाच्या पार्किंगमधून तरूणाची दुचाकी लांबवल्याप्रकरणी मार्च रोजी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादावाडी परिसरातील कल्याणीनगर येथील नीलेश बापुराव पाटील (वय ३०) हे २० मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सागर पार्क मैदानावर आले. यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ एएम ५२७१) या क्रमांकाची दुचाकी सागर पार्क मैदानाच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. काम आटोपल्यावर परत घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी नीलेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here