जळगाव : प्रतिनिधी
साईमत मीडिया प्रा.लि.च्या संचालकपदी सुप्रिया परेश बऱ्हाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
सुप्रिया परेश बऱ्हाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी साईमतच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात केक कापून त्यांना साईमत परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी सुप्रिया बऱ्हाटे यांची साईमत मीडिया प्रा.लि.च्या संचालकपदी नियुक्तीची घोषणा करून त्यांना वाढदिवसाची अमोल भेट दिली. तसेच त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान केले. याप्रसंगी लोकहित दर्पणच्या संपादिका सुरेखाताई बऱ्हाटे, साईमत मीडिया प्रा.लि.चे संचालक परेश बऱ्हाटे, तुळशीदास येवले, रत्ना येवले साईमतचे व्यवस्थापक सुनिल अहिरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे, यांच्यासह साईमत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल सुप्रिया बऱ्हाटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.