जळगाव ः प्रतिनिधी
यावल शहरातील मेनरोडवरील श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन आज मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक, 7 वाजता नित्य आरती, सकाळी 9 वाजता होम-हवन, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती झाली तर सायंकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक शहरातून काढली जाणार आहे. पालखी मिरवणुकीची सांगता मंदिरात झाल्यावर सायंकाळी 7 वाजता श्रींची धूप आरती व नंतर भाविकांना महाप्रसाद वितरण केले जाणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ साईभक्तांनी घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय नेवे, उपाध्यक्ष गोपालसिंग पाटील, सभासद तोतारामदादा नन्नवरे, गणेश बुरुजवाले, ॲड.अशोक सुरळकर, विश्वनाथ कोळी, हर्षल मोरे, भूषण महाराज, विनायक कोळी, लक्ष्मण कोळी, महेश महाजन, अरुण कोळी, रमेश कोळी, नंदन वळींकर, अनिल कोळी, गणेश बडगुजर, सुभाष बडगुजर आदींनी केले आहे.