सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

0
14
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल च्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर 35 पैशांनी महागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात येत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत आता 94.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. सलग महाग होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

एकीकडे पेट्रोल पंपावरच्या मीटरचे आकडे दररोज वाढत चालले आहेत आणि तेवढ्याच वेगानं तुमचा-आमचा खिसाही रिकामा होत चालला आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैसे तर डिझेलच्या दरात 40 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 112 रुपये तर डिझेलसाठी 103 रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी महागाई देखील वाढणार हे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञाची गरज नाही. इंधन दरवाढीला ब्रेक तरी कधी लागणार असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जातोय. पेट्रोल-डिझेल च्या किमतीत वाढ झाल्यामुळं परिवहनासोबतच भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही कडाडल्या आहेत.

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेल च्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल -डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का? यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं…

पेट्रोल- डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here