सरस्वती विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शन

0
13

साईमत यावल प्रतिनिधी

यावल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरावर शनिवार दि.12 ऑगस्ट रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यात लहान गटात प्रथम क्रमांक हर्षल बुरुजवाले तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक विवेक पाटील यांनी पटकावला.

 

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मुख्याध्यापक जी. डी. कुलकर्णी हे होते. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक पी. एस. सोनवणे, प्रा. एस. एम. जोशी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनामध्ये 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला स्पर्धेसाठी मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान व उपविषय आरोग्य , पर्यावरणासाठी जीवनशैली, शेती, दळणवळण आणि वाहतूक, संगणकीय विचार असे होते. कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक ए. डी. चव्हाण, ए. एस. सूर्यवंशी, एच.डी.चौधरी, एम. एम. गाजरे, बी. पी. वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमासाठी यावल तालुका विज्ञान समन्वयक व उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी दिपक पाटील, एन.डी.भारुडे, एस. बी. चंदनकार बापू ठाकूर, दिपक जोशी, किरण ओतारी, मनिष तांबोळी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here