यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यात नावारूपाला आलेली अठरा वर्षा पासूनची विश्वसनीय शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल.या शाळेतील सन 2021-22 या वर्षाची पहिली दहावीच्या वर्गाची बॅचने घवघवीत यश संपादन केले.
यात यावर्षी दहावीचे दहा विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन करून शाळेचे नाव लौकिक केले नर्सरी पासून ते दहावीपर्यंतचे आपल्या शाळेत असलेले हे विद्यार्थी 100% निकालाने पास झाले. त्यातील 90% मुले हे डिस्टिंक्शन मध्ये आले आहेत.पृथ्वी रमेश तायडे 86% मिळवत शाळेत सर्व प्रथम आली.
तमन्ना फिरोज तडवी ही 83.80 % मिळून द्वितीय आली.ओम चौधरी 83.40% तर हिमांशू तडवी 82.40%, युगल नाफडे 80.20%,शेख बाशीद याला 77%,अबरार खान76%, जुनेद खान 72.80%,शेख रेहमान खान 73.40%,रेहान खान 64.80% असे गुण मिळवून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस संस्थाचालकांनी मनःपूर्वक शुभेच्छा.सरदार वल्लभ भाई पटेल तर स्कूलच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा शैक्षणिक कामकाजात महत्वाची भूमिका निभावल्याने पालकवर्गात समाधानकारक बोलले जात आहे,आजपर्यंत केलेल्या इतक्या वर्षाच्या मेहनतीची आज त्यांना खरी पावती मिळाली आहे.