पुणे प्रतिनिधी
ऐतिहासिक दागिन्यांच्या निर्मितीसाठी बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध असलेल्या पीएनजी सन्सने महानयोद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित सम्राट पृथ्वीराज चित्रपटातील दागिन्यांचे डिझाइनिंग व क्यूरेशन केले आहे. तसेच या दागिन्यांचे प्रदर्शन पुणे, नाशिक व कर्नाटकातील कलबुर्गी येथील दालनात भरवले. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सम्राट पृथ्वीराज चित्रपटातील दागिन्यांसंदर्भात पीएनजी सन्सचे सीएफओ व मार्केटिंग हेड आदित्य मोडक म्हणाले, १९० वर्षांपासून संस्कृती व दागिन्यांचा अभ्यास सातत्याने करत आहे. पीएनजी सन्सकडे अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट आले. ऐतिहासिक चित्रपटांसाठी मूळस्वरूपातील दागिने घडवणारी सराफी पेढी, अशी पीएनजी सन्सची ओळख बनली. पृथ्वीराज चित्रपटामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाला. ’ मोडक म्हणाले, दागिन्यांसाठी पृथ्वीराज ज्वेलरी कलेक्शनमध्ये दागिने डिझाइन केले आहेत. राजपुताना शैलीतील विविध प्रकारचे हार, माळा, कडे, बिंदी, कंबरपट्टे, शिरपेच, बाजूबंद, कर्णफुले, पैंजण, नथनी आगामी काळात पुण्यामध्ये पीएनजी सन्सच्या हॅपी कॉलनी-कोथरूड, सोलापूर येथील दालनांत प्रदर्शन भरवणार असल्याचे आदित्य मोडक यांनी सांगितले.