जळगाव : प्रतिनिधी
शहरातील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे काम प्रगतीपथावर आहे हे उड्डाण पूलाच्या मध्यभागी सम्यक बुद्ध विहार येत आहे.
त्यामुळे तेथील औटा कदाचित पुढील काळात तोडण्यात येऊ शकतो यासाठी महापौर महाजन हे पाहणी करण्यासाठी आले असता. परिसरातील नागरिकांनी विनंती केली आहे कि जर हा औटा तोडला तर पुन्हा ते बनवून द्यावा यावेळी महापौर महाजन यांनीही नागरिकांना आश्व्सत केले आहे.
दि.5 मे रोजी इंद्रप्रस्थ नगर येथील कानळदा रोड ते रिंग रोड दरम्यान होणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूलाचे कामाचे निरीक्षणं करण्यासाठी महानगरपालिका कर्मचारी व रेल्वे अधिकारी यांच्यातर्फे निरीक्षण करण्यात आले होते. या प्रसंगी जो उड्डाण पूल बनत आहे त्या दरम्यान दूध फेडरेशन रोड वरील सम्यक बुद्ध विहारचा औटा अडसर ठरत आहे आणि त्यामुळे सम्यक बुद्ध विहार समितीतील सर्व सद्यस व परिसरातील नागरिक औटा तोडायचा नाही यासाठी जमलेले होते आणि जर औटा तोडायचाच असेल तर त्याठिकाणी सम्यक बुद्ध विहार ची नव्याने जीर्णोद्धार करावा त्याच ठिकाणी बुद्ध विहार नव्याने बांधून देण्यात यावे व वटा सुद्धा नव्याने बांधून देण्यात यावा ही भूमिका घेऊन सम्यक बुद्ध विहार समिती व परिसरातील सुजाण नागरिक त्या ठिकाणी जमलेले होते आणि या भूमिकेवर ठाम होते त्यामुळे तेथील पुलाच्या कामाला दिरंगाई होत होती म्हणून आज खुद महापौर सौ.जयश्री ताई महाजन यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी खुद आश्वासन देऊन सांगितले की कामाच्या दरम्यान काही झाले तर विहार नव्याने चांगल्या पद्धतीने बांधून देण्यात येईल आणि महापौरानीं आश्वासनला मान देऊन सर्व सद्यस्य सांगितले की जर बुद्ध विहार नव्याने बांधून देण्यात आले तर कुठलीही अडचण होणार नाही याची ग्वाही दिली.
यावेळी नगरसेवक दिलीप पोकळे, मंगेश जोहरे, नवनाथ दारकुंडे, विजय सुरवाडे, राजु तायडे, नितीन मोरे, प्रशांत सोनवणे, राहुल बाविस्कर,सागर सोनवणे, नवल सपकाळे, अभिषेक चव्हाण,मनोज पोकळे तसेच परिसरातील सर्व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.