ठाणे : वृत्तसंस्था:एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. मद्यविक्री परवान्यासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना उद्या कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समीर वानखेडे यांच्याविरोधात ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करताना खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या नवी मुंबईतल्या बारचा परवाना रद्द केला होता. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी वानखेडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.