समाजसुधारक,सत्यशोधक, क्रांतीसुर्य,ज्ञानसुर्य,युगपुरुष महात्मा फुले यांची लोणार येथे जयंती साजरी….

0
72

लोणार (गुलाब शेख)

विद्येविना मती गेली |
मतीविना नीति गेली |
नीतीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले!

लोणार शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, ढोल-ताशांच्या संगीतमय वातावरणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून शोभायात्रेची सुरुवात झाली.
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते,लेखक,विचारवंत आणि जातिविरोधी समाजसुधारक होते. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था निर्मूलनासाठी आणि स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते.त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि त्यांची जयंती दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.त्यांनीच रचला इतिहास
स्त्री सन्मानासाठी ते तळमळले धळपळले, बालविवाह विरोधासाठी।
त्यांनी पेटवली मशाल,स्त्री शिक्षणासाठी।शिक्षण अर्पण केले,बालकल्यानासाठी।
महात्मा ज्योतिबा फुले, परमेश्वर रूप दलितांसाठी।
पहिली शिवजयंती साजरे करणारे,समाजसुधारक,सत्यशोधक क्रांतीसुर्य,ज्ञानसुर्य,युगपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लोणार येथील शोभायात्रे साठी महात्मा फुले सेवा मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here