जळगांव प्रतिनिधी
शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणाऱ्या तरुणावर चाकूहल्लाने त्याचा मयत झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार (वय २८) हा तरूण एकटा राहत होता. रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी त्याला रुग्णलयात हलविले. उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याचा दुर्देवी अंत झाला.
सागर नरेंद्र पवार हा तरुण समता नगरात एकटाच राहत होता. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणाऱ्या या तरूणाच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ आहे.