जळगाव ः प्रतिनिधी
जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने संस्कार भारती दर वर्षी वसुंधरेचे पूजन व अलंकरण करुन या भूमातेला नमन करते.संस्कार भारती जळगाव समिती ने वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने चिमुकले राम मंदिर परिसरात भुअलंकरण करून या भूमातेचे पूजन केले. विषेश म्हणजे रांगोळीची संपूर्ण भारतात एकच डिझाईन काढली जाते जी केंद्रातर्फे दिली जाते.
या कार्यक्रमासाठी प्रांत भुअलंकरण प्रमुख गीता रावतोळे, जळगाव समिती भुअलंकरण प्रमुख रेखा लढे, सहप्रमुख संगीता पिंगळे,शारदा सावदेकर,प्रतीभा नेवे, प्रतीक्षा कापडणे,श्री.लढे व वर्षा बऱ्हाटे यांनी सहभाग घेतला.
