जळगांव (प्रतिनिधी)
जळगांव शहर महानगरपालिका येथे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सपना श्रीवास्तव यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सपना श्रीवास्तव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली व आगामी काळात संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण, महिला व बाल विकास या क्षेत्रात संस्था विशेष उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
मा. आयुक्त यांनी संस्थेला भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
या वेळी संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका सपना श्रीवास्तव, सदस्य योगानंद कोळी, मौलाना आझाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख, सदस्य योगेश बाविस्कर, मौलाना आझाद संस्थेचे सदस्य अतुल चौधरी आदी उपस्थित होते.
Attachments area