जळगाव ः प्रतिनिधी
श्रीराम मंदिरातून 14 जून रोजी श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान करण्यात आले. त्याआधी सोमवारी जुन्या जळगावातील श्रीराम मंदिरात कुमारी मुलींच्या व मान्यवरांच्या हस्ते या पालखीचे पूजन करण्यात आले.
प्रतिवर्षीप्रमाणे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात पालखी भोईटेगढी, कोल्हेवाडा, तळेलेवाडामार्गे गोपाळपुरा येथे श्री सद््गुरू बाबाजी महाराज समाधी मंदिरात भजन होईल. त्यानंतर या पालखीने श्री सद््गुरू अप्पा महाराज समाधी मंदिरात मुक्काम केला व आज 14 जून रोजी सकाळी 8 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते.