संत तुकारामांचे अभंग ऊर्जा देतात आणि मार्ग दाखवतात – मोदी

0
36

पुणे :- प्रतिनिधी 

संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. त्यांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तो अभंग. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत” या शब्दात पंतप्रधान मोदींनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचे महत्त्व विशद केले. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण झाले. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते. तसेच, संत तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. असे मोदी म्हणालेत.

भारत शाश्वत आहे कारण भारत संतांची भूमी आहे

“सध्या देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा करतो आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही जगातील प्राचीन जीवित सभ्यतांपैकी एक आहोत. याचे श्रेय भारताच्या संत परंपरेला आहे. भारताच्या ऋषींना आहे. भारत शाश्वत आहे कारण भारत संतांची भूमी आहे.” या शब्दांमध्ये मोदींनी देशातील संत परंपरेचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here