भुसावळ : प्रतिनिधी
श्री राजपुत करणी सेनेच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी शिवसैनिक पवन मेहरा यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकेंद्रसिंह कालवी यांच्या तसेच राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शामसिंग ठाकूर यांच्या आदेशाने प्रदेशउपाध्यक्ष प्रविणसिंह पाटील तसेच खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंह पाटील व जळगाव जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंह मोरे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
शहरात विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले व विविध पदावर कार्याचा अनुभव असलेले सामाजिक कार्यकर्ते पवन मेहरा यांच्या कार्याची दखल घेत त्यांची श्री राजपुत करणी सेनेच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे संघटनेच्यावतीने सांगितले आहे.
दरम्यान, या निवडीबद्दल नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पवन मेहरा म्हणाले की, संघटनेच्या मान्यवरांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय देण्याचे काम कसे करता येईल, सदैव प्रयत्नशिल राहण्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या निवडीबद्दल कृउबा समिती उपसभापती अशोक पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, प्रविण पाटील, यशवंत चौधरी, अभिजीत पाटील, चरणसिंग चौधरी, सोनी ठाकूर, किशोर चौधरी, राहूल राजपूत यांनी अभिनंदन केले.