यावल सुरेश पाटील):
यावल येथे चोपडा रोडवर अक्षदा ढाब्याजवळ महाजन पेट्रोल पंपाच्या समोर श्री दादाजी सांप्रदाय पायी दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत.
श्री दादाजी संप्रदाय गुरु परंपरा असलेल्या पायी दिंडी सोहळा सालाबाद प्रमाणे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री क्षेत्र दादाजी दरबार येथून सोमवार दि.14 फेब्रुवारी 2022 रोजी प्रस्थान झाली हा भव्य दिंडी सोहळा अमळनेर,चोपडा मार्गावरून मध्यप्रदेशात खंडवा येथे श्री क्षेत्र दादाजी धाम येथे जाताना मंगळवार दि.22रोजी सकाळी 7:30 वाजता यावल येथे चोपडा रोडवर महाजन पेट्रोल पंपाजवळ, अक्षदा ढाबा संचालक अमृत पाटील,राकेश पाटील यांच्यासह श्री दादाजी सांप्रदायातील शेकडो भक्तगणांनी,भाविकांनी नागरिकांनी उपस्थित राहून दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत केले तसेच श्री श्री महान 1008 धुनिवाले केशवानंद दादाजी व हरिहरजी भोले भगवान यांच्या प्रतिमांचे,पादुकांचे रथामधून दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करून घेतले. श्री दादाजी सांप्रदायाच्या या भव्य दिंडी सोहळ्यात अंदाजे चार ते पाच हजार स्री-पुरुष भाविक सहभागी होत असतात या पायी दिंडी सोहळ्याचे मध्य प्रदेशात खण्डवा येथे श्री क्षेत्र दादाजी धाम येथे दि.28फेब्रुवारी 2022 भव्य अशाप्रकारे आगमन होत असते.
श्री दादाजी सांप्रदायाचा अल्पपरिचय- संत-महंत ऋषी-मुनी व देवी-देवतांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमीमध्ये जगद्गुरु श्री आद्यशंकराचार्य व ज्योतिर्मठाचे प्रथम शंकराचार्य श्री तोटकाचार्य यांच्या गुरुपरंपरेतील हा अध्यात्मिक दादाजी सांप्रदाय आहे.या दादाजी सांप्रदायामधील महान संत श्री कमलभारती आणि श्री गौरीशंकर महाराज यांनी श्री नर्मदामैया परिक्रमेची परंपरा आजीवन जोपासली श्रीगौरीशंकर महाराजांनी नर्मदा नदी मध्ये घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्यावर अति प्रसन्न होऊन साक्षात परमपिता परमात्मा आद्य शिवाने श्री धुनीवाले दादाजी या नावाने अवतार धारण करून त्यांच्या तपो सामर्थ्याने अनेक अलौकिक लिला चमत्कार केले असल्याची आख्यायिका होती आणि आहे.
यानंतर श्री हरिहरजी भोले भगवान (छोटे दादाजी),शिवानंद सरकारजी(अंबाडा),भक्तांनंदजी महाराज(निमगव्हाण तालुका चोपडा),सिद्धानंदजी महाराज (सुरत गुजरात)आणि त्यानंतर शिवानंदजी महाराज(पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे) हे आम्हाला परमसद्गुरु रूपात प्राप्त झाले व दादाजी सांप्रदायाविषयी तसेच आत्मकल्याणाचे सखोल ज्ञान दिले व आजही देत आहेत.परम सद्गुरु श्री शिवानंदजी महाराज यांचे आम्हा भक्तांसमवेत दादा नामाचा प्रचार प्रसाराचे कार्य संपूर्ण महाराष्ट्र,भारतभर आणि पाश्चिमात्य देशांमध्ये चालू आहे. तसेच दादाजी सांप्रदायाचे गुढ रहस्य व दादाजी भक्ताचे आराध्यदैवत श्री श्री महान 1008 धुनीवाले दादाजी यांच्या नामाची महती अवघ्या विश्वामध्ये पोहोचविण्याचे अद्भुत कार्य परमसद्गुरु करत आहे.समस्त मानवी जीवात्म्याचे भौतिक त्याचबरोबर अध्यात्मिक कल्याण व्हावे हीच यामागील अपेक्षा व श्रेष्ठ हेतु आहे.या श्रेष्ठ कार्यामध्ये संपूर्ण दादाजी भक्त एकत्र येऊन मोठ्या उत्साहात आणि अपेक्षेने भव्य दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात.या दिंडी सोहळा साठी आणि कार्यक्रमासाठी ठीक ठिकाणी ठरलेल्या तारखेच्या दिवशी आणि वेळेवर नाश्ता पाणी प्रसाद,दुपारच्या विश्रांतीची व्यवस्था,दुपारच्या प्रसादाचे अन्नदाते,रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था,रात्रीच्या प्रसादाचे अन्नदाते आणि प्रवचन सेवा नियोजनबद्धरीत्या मदत करणारे नागरिक भक्तगण निस्वार्थपणे करीत असतात.