Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»श्रीराम मंदीर निर्माण निधी संकलन अध्यक्षपदी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज
    फैजपूर

    श्रीराम मंदीर निर्माण निधी संकलन अध्यक्षपदी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

    saimat teamBy saimat teamDecember 21, 2020No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर : प्रतिनिधी
    अयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी भारत भूमितील सर्व जाती धर्माच्या प्रत्येक नागरिकाचा तन-मन-धनाने सहभाग असावा व या मंदिरासाठी माझेही योगदान आहे, अशी प्रत्येकाच्या मनात आंतरिक भावना उत्पन्न व्हावी, या प्रमुख उद्देशाने श्रीराम तीर्थक्षेत्र अयोध्या यांनी देशात विभागवार समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देवगिरी प्रांत भुसावल जिल्ह्याचे मुख्य कार्यालय भुसावळ येथे स्थापन करण्यात येऊन त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी झालेल्या बैठकीत समिती गठीत करून सर्वानुमते परमपूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांची देवगिरी प्रांत भुसावल जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
    या बैठकीत जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यालय व स्थानिक समित्या स्थापन करण्यात येणार आहे. दि.१५ जानेवारी २०२१ पासून श्री राम मंदिरासाठी प्रत्यक्ष निधी संकलनाला सुरुवात करण्यात येणार असून ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संकलन केले जाणार आहे. देणगीदारांना संस्थेची अधिकृत जमा पावती दिली जाणार असल्याचे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. या ऐतिहासिक कार्यात सहभागी होऊन प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. देवगिरी प्रांत भुसावळ जिल्हा समिती पुढीलप्रमाणे आहे.
    अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, निधी संकलन उपाध्यक्ष प्रजापिता ब्रह्मकुमारी सिंधू दीदी भुसावळ, निधी संकलन उपाध्यक्ष प्रा.संजय बाविस्कर, निधी संकलन उपाध्यक्ष वसंतराव महाजन तांदलवाडी, सदस्य शास्त्री भक्तीप्रकाश दासजी महाराज सावदा, प.पु. गोपाल चैतन्यजी महाराज पाल, हभप हरणे महाराज मुक्ताईनगर, महामंडलेश्‍वर पुरुषोत्तमदासजी महाराज फैजपूर, श्री श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, संत श्री स्वरूपानंदजी महाराज डोंगरदे, हभप धनराज महाराज अंजाळेकर, प.पू.सुनील कुमार उदासी वेदधाम, पांडव बाबा, मुरलीधर श्रीरंगी भुसावळ, प.पू.हंसदासजी महाराज, ऋषिकेश महाराज, प.पू. सुरेशशास्त्री मानेकर बाबा, महेश फालक भुसावळ, मिलिंद अग्रवाल भुसावळ, प्राचार्य पी.आर.चौधरी फैजपूर, शशिकांत देशमुख यावल, रमेश विठू पाटील पाडळसे, डॉ. निलिमा नेहते भुसावळ, विभाग संघचालक शशी महाजन भालोद, श्रीकृष्ण चावरीया, श्रीकांत लाहोटी, जिल्हाध्यक्ष विश्‍व हिंदू परिषद, शशिकांत कोलते, सचिन कडू चौधरी निंभोरा यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Faizpur : कुसुमताई विद्यालयात गीता जयंती निमित्त भाषण स्पर्धा

    December 10, 2025

    Chain : यावल येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

    December 8, 2025

    Hilly : डोंगराळे गुन्ह्यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.