शेतीच्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा जलसमाधीच्या पवित्र्यात ; बहुलखेड्यात दोनशे शेतकऱ्यांचा निर्णय….महसूल विभागाची मध्यस्थी

0
52

सोयगाव तालुका प्रतिनिधी

जलसंधारण विभागाच्या पाझर तलावाच्या सांडव्यावरून शेतकऱ्यांचा शेतीसाठी रस्ता संबंधित ठेकेदाराने बंद करून पर्यायी धरणाच्या खालून करून दिलेला रस्ता हा चुकीच्या पद्धतीचा असल्याने चुकीच्या रस्त्यावरून शेतीची पेरणी केलेली आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराने जुना वापरता रस्ता बंद करून चुकीचा रस्ता दिल्याने शेतकऱ्यांची शेतीकडे जाण्यासाठी वापर बंद झालेला आहे त्यामुळे सोमवारी बहुलखेड्यातील संतप्त दोनशे शेतकऱ्यांनी पाझर तलावात जलसमाधीचा निर्णय घेतला होता.शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची कुणकुण लागताच महसूल विभागाने दखल घेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी करून आंदोलन एक दिवसासाठी स्थगित करण्याबाबत विनवणी केल्यावरून शेतकऱ्यांचा आंदोलनाचा झेंडा खाली उतरविला होता परंतु अद्यापही पाझर तलावाच्या घटनास्थळी संबंधित ठेकेदाराने भेट दिलेली नव्हती.त्यामुळे बहुलखेड्यात खळबळ उडाली होती.

बहुलखेडा गावालगत जलसंधारण विभागाचा पाझरतलाव आहे.या पाझर तलावाला ओलांडून पुढे सुमारे चारशे हेक्टर शेती क्षेत्र आहे परंतु पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीवरून असलेला जुना वापरता रस्ता ठेकेदाराने बंद करून नवीन रस्ता या शेतकऱ्यांना काढून दिला परंतु या रस्त्याने शेतीच्या पेरण्या झालेल्या असल्याने हा रस्ता वापरण्या जोगे नसल्याचे संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे असून या दोनशे शेतकऱ्यांना पाझर तलावावरून असलेला जुना रस्ता शेताकडे जाण्यासाठी खुला करून द्यावा अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी केलेली असून या मागणीकडे जलसंधारण विभागाने तिलांजली दिल्याने संतप्त दोनशे शेतकऱ्यांनी पाझर तलावात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा निर्णय घेताला होता परंतु महसूल विभागाला या आंदोलनाची कुणकुण लागताच मंडळ अधिकारी मारोती धोंडकर पाझर तलावावर पोहचले व शेताकात्यांची अडचण समजून घेत त्यांना रस्त्याचा मार्ग काढण्याबाबत आश्वासन देत संबंधित रस्त्याचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाला दाखल केला आहे.यावेळी पाझर तलावाच्या भिंतीवर जलसमाधी च्या आंदोलनासाठी चरणदास चव्हाण,भाईदास चव्हाण,साईदास चव्हाण,कडूबाई खरे,दुजेसिंग राठोड,अनिताबाई चव्हाण,भाईदास राठोड,परमदीबाई चव्हाण,सुरेश चव्हाण,शोभाबाई पाटील,शोभाबाई पाटील,अर्जुन पाटील,अनिल महाजन,दगडू जाधव,दशरथ जाधव,प्रेमसिंग जाधव,रणजीत राठोड,एकनाथ राठोड,गुरुबाथ राठोड,देविदास गणपत,साईलाल महाराज,रोहिदास राठोड,बद्री चव्हाण,हरिदास चव्हाण,सुरेश चव्हाण,महारु राठोड,प्रभू पवार,आदींसह दोनशे शेतकरी पाझर तलावाच्या भिंतीवर उभे राहून जलसमाधीचं तयारीत होते परंतु महसूल विभागाने त्यांना मध्यस्थी केल्याने जल समाधी आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

शेतात जाण्यासाठी अडचणीचा मार्ग झालेल्या दोनशे शेतकऱ्यांनी पाझर तलावावरील जुनाच रस्ता वापरण्यासाठी खुला करून द्या अशीच मागणी प्रशासनासमोर केली होती यावर मार्ग काढण्याचे आश्वासन मंडळ अधिकारी मारोती धोंडकर यांनी दिल्यावर संतप्त शेतकरी शांत झाले होते.मात्र रस्त्याबाबत शेताकात्यांची मागणी लावून धरली होती.या शेतकऱ्यांना पाझर तलावावरून जाणारा जुनाच रस्ता परत द्या त्रस्त बंद झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता येत नसल्याने घरीच बसून राहावेलागत आहे.

पाझर तलावात साचले पाणी

या जलसंधारण विभागाच्या पाझर तलावात पाणी साचू लागल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता तेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

संबंधित ठेकेदाराला महसूल ची नोटीस

महसूल विभागाकडून संबंधित विभागाला तातडीने नोटीस पाठविण्यात आलेली असून ठेकेदाराला हाजीर हो चे आदेश महसूल विभागाने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here