शेतकऱ्यांना वाटप होणाऱ्या पीक कर्जाच्या कालावधीत बोदवड तालुक्यातील ए.टी.एम.  24 तास रोख उपलब्ध ठेवा बोदवड शिवसेनेची मागनी

0
49
बोदवड सुहास बारी
  जळगाव  जिल्हा मध्य सहकारी  बँकेचे अध्यक्ष मा. गुलाबराव देवकर यांच्या दालनात त्यांना निवेदन देण्यात आलेत
 जळगाव जिल्हा मध.सह. बँक जळगाव च्यामाध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज उपलब्ध करून दिले जातात. शेतकरी बँक म्हणून जिल्हा बँकेचा लौकिक आहे.  २०१८ पासून शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड पुरविण्यात आलेले असून सर्व शेतकर्‍यांना पीक कर्जाची रक्कम एटीएममधून काढावी लागते.  दुर्दैवाने, आपल्या बँकेत कुठेही ATM नाहीत.  डिजिटल पेमेंटमध्ये तुमचे बँकिंग व्यवहार मागे पडत आहेत.  आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर विसंबून बँकेने शेतकऱ्यांना एटीएमसमोर उभे केले आहे.  पिकांसाठी कर्ज वाटपाच्या वेळी आणि ज्या शेतकऱ्यांना एटीएम वापरण्यात कोणतीही अडचण येत असेल अशा शेतकऱ्यांसाठी बँकेतून त्यांना कर्जाची रक्कम अदा करण्यात यावी, तसेच संबंधित एटीएममध्ये २४ तास रोख उपलब्ध असणे आवश्यक आहे.  आपल्या शाखा व्यवस्थापकानां सूचना द्याव्यात, अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल.
त्या वेळी उपस्थित तालुका संघटक शांताराम कोळी , नगराध्यक्ष आनंदा पाटील, उपनागध्यक्ष संजय गायकवाड, नगर सेवक प्रिंतेश बरडीया,माजी उपजिल्हाप्रमुख विनोद पाडर, शहरप्रमुख राहुल शर्मा,विभाग प्रमुख गोपाळ पाटील, माजी शहर प्रमुख राजेश नानवाणी,माजी नगरसेवक धनराज गंगतिरे,अमीन मान्यार, पप्पू भांज्या सहा शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here