जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे आज रात्री साडेआठ वाजता युवासेना अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अजिंठा लेणी येथून नाशिक कडे जात असताना यांचे शेंदुर्णी येथेआगमन झाले.
यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनोहर पाटील युवा सेना जिल्हा उपप्रमुख विश्वजीत पाटील शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश राव पांढरे जामनेर तालुका उपप्रमुख डॉ सुनील अग्रवाल शेंदुर्णी शहर अध्यक्ष संजय सूर्यवंशी ॲड भरत पवार युवा सेना अधिकारी शुभम घोलप अजय भाईआदींनी स्वागत केले शाल-श्रीफळ दिले शेंदुर्णी ग्राम दैवत त्रिविक्रमाची प्रतिमा भेट देण्यात आली शेंदुर्णी नगरीला मंदिरा करिता साडेचार कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार प्रकट केले यावेळी जामनेर दौरा आखण्याची त्यांना उपजिल्हाप्रमुख मनोहर पाटील यांनी विनंती केली त्यावर त्यांनी तालुक्यासाठी पूर्ण वेळ देण्याची ग्वाही दिली.
त्यानंतर शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने गोविंद अग्रवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी त्यांची भेट घेतली शेंदुर्णी येथील मंदिरांच्या विकासासाठी काही निधी अपूर्ण राहिलेला असून दहा कोटीच्या निधीची मागणी केली व त्या संदर्भात निवेदन व कागदपत्रे सादर केलीव शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की लगेच निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करतो अशी ग्वाही दिली यावेळी त्यांच्यासोबत शेंदुर्णी नगरपंचायत चे नगरसेवक नागरिक उपस्थित होते. रेल्वे स्टेशन भागात झालेल्या त्यांच्या भेटीत असंख्य नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी तालुक्यातील शिवसैनिक व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.