जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील इंद्रप्रस्थ नगर भागातील शिव शंकर कॉलनीतील राहणारे विकी चव्हाण या युवकाचा नाशिक – मालेगाव रस्त्यावर अपघात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी व क्षण फोटो स्टडियोचे संचालक धनराज प्रकाश चव्हाण (वय ३२) हे आपल्या चारचाकी गाडीसह व दोन सहकारी मित्रासोबत नाशिक येथे लग्नाचे फोटो काढण्यासाठी गेले होते. सर्व काम आटोपल्यानंतर जळगावात येत असताना मालेगाव ते नाशिक रस्त्यावर चारचाकी गाडीचा अपघातात धनराज(विकी)चव्हाण हा घटनास्थळी मयत झाला. तर अन्य तीन व्यक्ती जखमी असल्याचे समजते. विकी व निलेश यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. अपघातात निलेश यांच्यासह विनोद दांडगे, कल्पेश पाटील हे जखमी असल्याचे समजते.
कसा झाला अपघात
मुंबई – आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातामध्ये जळगावातील छायाचित्रकार धनराज चव्हाण(विक्की) हा तरूण जागीच ठार झाला तर सोबत असलेले क्षण स्टुडीओचे संचालक निलेश चव्हाण व सोबतचे सहकारी विनोद दांडगे, कल्पेश पाटील हे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ट्रॅव्हल्स, आयशर आणि कारमध्ये ही दुर्घटना घडली. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या सौंदाणे गावाजवळ हा अपघात झाला. घटनेतील जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताची सविस्तर माहिती अशी की, मालेगावच्या सौंदाणे गावाजळ एका ट्रॅव्हल्सने कारला धडक दिली. चालकाला वेगावर नियंत्रण करता आले नाही. त्यामुळे शंभर फुटापेक्षा जास्त ट्रॅव्हल्ससोबत कारही फरफटत गेली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला