जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील रेल्वे पूल तुटल्यापासून शिवाजीनगरचा जळगाव शहराशी संबंध जसा तुटलेला आहे असे वाटते कारण महापालिकेतील अधिकान्यांना शिवाजीनगरमधील नागरिकांकडून फक्त कर घेण्याशी संबंध येतो. वास्तविक शिवाजीनगर मध्ये जवळपास ७० ते ८० हजार लोकवस्तीचा परिसर येतो. परंतु त्यामानाने सुविधाचा अभाव आहे. त्यातच सध्या अमृत योजनेमुळे रस्ते खोदले गेले असून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लहान मुले व ज्येष्ठांना याचा अत्याधिक प्रमाणात त्रास होतोय म्हणून लवकरात लवकर आपण शिवाजी नगर मधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा तसेच शिवाजीनगर मधील साफसफाईचा प्रश्न हा महत्वाचा असून सदर युनिटचे अधिकारी हे प्रत्येक वेळी एकच उत्तर देतात आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून आम्ही येऊ शकत नाही.यावेळी आयुक्त गायकवाड यांना निवेदन देण्यात आले
आपण नागरिक म्हणून केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही संबंधित अधिकारी व कर्मचारी स्पष्टपणे कामचुकारपणा करतात असे दिसून येते. तरी आपणास नम विनंती कृपया अशा अधिकारी व कर्मचान्यांची त्वरित बदली करण्यात येऊन तेथे कार्यक्षम अधिकारी व कर्मचारी नेमावेत जेणेकरून नागरिकांना स्वच्छतेचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आमच्या भागात गंभीर झालेला आहे संपूर्ण शेवाळयुक्त पिवळे पाणी नागरिक पीत असून बहुतेक नागरिकांना याचा त्रास होऊन आजारी पडले आहेत. यासह शिवाजीनगर है विविध समस्यांनी ग्रासले असून महानगरपालिकेकडून शिवाजीनगर भागाला न्याय दिला जात नसेल तर कृपया आम्हाला ग्रामीण भागामध्ये वर्ग करण्यात यावे हो नम विनती वरील
समस्याचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे अन्यथा राहिवासीयांकडून जनआंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिववंदन फौंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ, अमोल सांगोरे, सुनील ठाकूर, विनोद कोल्हे, महेश चिंचोलकर यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.