शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियानानिमित्त शहरातून निघाली

0
63

जळगाव ः प्रतिनिधी
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका व पक्षसंघटन वाढीसाठी जिल्ह्यात चार दिवस शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शहरात वातावरण निर्मितीसाठी शिवसेना व युवासेनेच्यावतीने काल दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर महाबळ परिसरात युवासेनेच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किट्सचे वाटप करण्यात आले.

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेचे राज्यभरातील नेते जळगावात दाखल झाले आहेत.जिल्हाभरात 26 ते 29 मे दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत काल शहरात वातावरण निर्मिती व्हावी यासाठी नेहरू चौकापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे रॅली निघून शिवतीर्थ मैदानाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक मार्गे जावून मेहरूण भागात रॅलीचा समारोप झाला.

या वेळी संपर्क प्रमुख संजय सावंत, गजानन चव्हाण, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. शहराच्या वेगवेगळ्या भागातून रॅली काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने नागरिकांचे लक्ष वेधले होते. या प्रसंगी युवासेना सहसचिव विराज कावडीया, शिवराज पाटील, शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, किरण भावसार, अमित जगताप, प्रशांत फाळके, उमाकांत जाधव, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, विजय बांदल, झाकीर पठाण व शिवसेनेचे कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
युवासेनेच्या वतीने महाबळ कॉलनी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, गजानन चव्हाण, संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे यांच्या उपस्थितीत आक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किट्सचे वाटप करण्यात आले. या वेळी युवासेनेचे प्रदेश सहसचिव विराज कावडीया, अमित जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here