भुसावळ ः प्रतिनिधी
येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निळकंठ सुदाम फालक उर्फ पंछी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजेच्या सुमारास तापी नदीकाठी वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वारकरी सांप्रदायाचे बेळी येथील गादीपती ह.भ.प.भरत महाराज, माजी मंत्री तथा आ.संजय सावकारे, माजी आ.निळकंठ फालक, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पिंटू कोठारी, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, दीपक धांडे, किरण कोलते आदीसह नगरपरिषदेतील नगरसेवक व समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. ते माजी नगराध्यक्षा माधुरी फालक यांचे पती होत.