शिवसेनेचा वाघ भाजपला झेपणार नाही

0
66

मुंबई : वृत्तसंस्था

विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ खडसे यांनी बंड पुकारला आहे. त्यांच्यासोबत अनेक आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार असून राज्यातील ठाकरे सरकार कोसळणार असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत भाजपाला टोला लगावला आहे.

माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क-वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपला झेपणार नाही, असा टोला दिपाली सय्यद यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here