शिवसेनेचा दणका ; एकनाथ शिंदेंनी गटनेते पदावरुन हटवलं, ‘या’ आमदाराची तडकाफडकी नियुक्ती

0
51

मुंबई : प्रतिनिधी 

शिवसेनेचे  नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसनेमध्ये हालचालींना सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच दुसरीकडे मोठी कारवाई करत शिवसेनेने शिंदे यांना गटनेतेपदावरुन हटविले आहे. शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे.अजय चौधरी  यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, असा थेट प्रस्ताव शिंदे यांनी मांडला आहे.

 

शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमूळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेत एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवलं आहे. तर, शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान शिंदे यांना २० ते ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ नये यासाठी शिंदे यांना किमान ३७ आमदारांचा पाठिंबा असने आवश्यक आहे. आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीमध्ये केवळ १८ विधानसभा आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here