मुंबई : प्रतिनिधी
राज्यसभेतील पराभवानंतर आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने भाजपाला पराभूत करण्यासाठी मोट बांधली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून अतिरिक्त ४ मते काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पारड्यात टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भांत काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची चार ते पाच मतं काँग्रेसला देणार असल्याचे आश्वासन काँग्रेसला दिले आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. मतांचा कोटा गाठण्यासाठी छोटे पक्ष, अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र या निवडणुकीत शेवटी लढत ही जपच्या प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला रंगात आली आहे.
दरम्यान काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना विजयासाठी काँग्रेसला ८ मतं गरजेची आहे. शिवसेनेकडे त्यांच्या २ उमेदवारांसाठी लागणारी किमान मत असून ४ मत अतिरीक्त आहेत.अगोदर शिवसेना ही मते काँग्रेस आंणि राष्ट्रवादीला देण्यास मान्य नव्हती. मात्र आता शिवसेनेची मनधरणी करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याची माहिती आहे.