Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»शिरसोलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू ; पोलिस पथक घटनास्थळी दाखल
    क्राईम

    शिरसोलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू ; पोलिस पथक घटनास्थळी दाखल

    SaimatBy SaimatJune 20, 2022Updated:June 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    जळगाव – पाचारो रोडवर असलेल्या जैन व्हॅली कंपनीजवळ असलेल्या राजपाल नगर येथे महिलेचा आज सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मयत महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छदेनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये समजल्यावरच या महिलेचा मारहाणीत खून की पाय घसरून पडल्याचे स्पष्ट होणार आहे.

    मिळालेली माहिती अशी की, जळगाव – पाचोरा रस्त्यालगत असलेल्या जैन व्हॅली जवळ असलेल्या राजपाल नगरातील रहिवासी भाऊलाल भिल हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या पत्नी या दोघंही जैन व्हॅली येथे मजूरी करून आपल्या कुटूंबातील सहा मुली व एक मुलगा यांचा उदरनिर्वाह करतात. तर दि.20 रोजी सायंकाळी पती व पत्नी दोघही शिरसोली येथे बाजार करुन घरी आल्यानंतर पती भाऊलाल भिल हे दारु पिऊन घरी आले. त्यानंतर महिलेचे सहा मुली व एक मुलगा आपल्या आजीकडे गेले होते. त्यावेळी घरी नबाबाई व भाऊलाल हे दोघेही एकटे होते. त्यानंतर रात्री नबाबाई ह्या स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असतांना खाली पडल्याने मृत्यू झाला की रात्री पती भाऊलाल हे दारु पिऊन वाद झाल्यानंतर त्यांना मारहाण केल्याने मृत्यू झाला याबाबत अद्याप काहीही समजून आलेले नाही. तर सकाळी 2 वाजेच्या सुमारास भाऊलाल हे उठले असतांना त्यांना स्वयंपाक घरात पत्नी नबाबाई खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या त्यानंतर त्यांनी परिसरातील रहिवाशांना ही बाब सांगितली. यानंतर पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला कळविले.

    तत्काळ घटनास्थळी पोलिस अधिकारी कुमार चिंथा यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोनि.प्रताप शिकारे, एपीआय अमोल मोरे, पीएसआय दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी यांच्यासह पोलिस पथक याठिकाणी दाखल झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.