बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसाळा येथील मिळकत नंबर ३२२ मध्ये राजाराम कोळी यांच्या नावावर ती जागा असतांना त्यांच्या नावावर संजय नवलसिंग पाटील यांनी घरकुल बांधकाम करीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील संजय नवलसिंग पाटील यांचे घरकुल मंजूर झाले असतांना त्यांनी स्वतः लिहून दिले आहे की ही जागा माझी नाही.त्यामुळे त्यांच्या वारसांना ही जागा मिळावी. परंतु असे असतांना सुद्धा संजय पाटील यांच्या नावावर ही जागा झालीच कशी?असा संभ्रम निर्माण होत आहे.एवढेच नव्हे तर शिरसाळा गाव मध्ये अनेक अशा जागा आहेत की ते मागासवर्गीयांच्या नावावर जागा असतांना तिथे इतर समाजाच्या लोकांनी नमुना नंबर ८ ला नावे लावून तिथे घरकुल घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात समोर दिसून येत आहे.याबाबत पंचायत समिती व ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी यांचे हातमिळवणी असल्याचे देखील गावकरी बोलतांना दिसत आहे.त्यामुळे असे होत असलेले निकृष्ट दर्जाचे व बोगस घरकुल थांबवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात असून ज्या व्यक्तीच्या नावावर घर जागा आहे त्याच व्यक्तीच्या नावावर ते घरकुल व्हावे अशी मागणी होत आहे. संबंधित राजाराम कोळी यांच्या वारसाला न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असे तक्रारदार उर्मिला शामराव कोळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
प्रतिक्रिया
संबंधित नमुना ८ माझ्या काळातील दप्तरी लावलेला नसून तत्कालीन ग्रामसेवक यांनी केलेला असेल परंतु या संबंधित सर्व पुरावे तसेच इतर दस्तऐवज तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ग्रामसेवक संतोष करवते यांनी सांगितले.