शिमोगा येथे झालेल्या हत्याकांडाचा विश्‍व हिंदू परिषदेतर्फे निषेध

0
36

जळगावः कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्याची निर्घूण हत्या करण्यात आली. ती अतिशन निंदनीय व निषेधार्ह आहे ही हतया विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडेलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे अशी विश्‍व हिंदु परिषदेची धारणा आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमाँक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरू केले आहे त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे. कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना शिक्षा व्हावी अशी विश्‍व हिंदु परिषद तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पॉपुलर फ्रेंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमाँक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांची पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रूजलेली आहेत त्यावर बंदी घालून योग्य प्रतिंबध करावा अन्यथा विश्‍व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल असे देखिल निवेदनात नमुद करण्यात आले आहे. सदर निवेदनावर हरीषभाई मुंदडा, देवंद्र भावसार, श्रीराम बारी, राकेश लोहार, बंदी बाविस्कर, राजेंद्र नन्नवरे आदींच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here