Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»शिंदेनी केला थेट धनुष्यबाणावरच दावा ; उद्धव ठाकरे यांना बसणार मोठा दणका
    राजकीय

    शिंदेनी केला थेट धनुष्यबाणावरच दावा ; उद्धव ठाकरे यांना बसणार मोठा दणका

    SaimatBy SaimatJune 23, 2022Updated:June 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाइव्ह मुंबई प्रतिनिधी  :

    एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्ताच नाही तर शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाणही काढून घेण्याची तयारी करत आहेत. गुवाहाटीमधून शिंदे यांनी कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरु केली आहे. यामुळे शिंदे ही आपल्याकडे असलेली खरी शिवसेना आहे, असा दावा करत आहेत. त्याचबरोबर आपल्याला शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह आपल्याला दिले जावे अशी मागणी करणार आहेत. यामुळे ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि निवडणूक चिन्ह देखील जाण्याची शक्यता आहे.

    कायदे तज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी एका वृत्त वाहिनीला याबाबतची माहिती दिली. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, शिंदे यांनी म्हटले म्हणून निवडणूक आयोग लगेच घोषणा करणार नाही. काही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. यासाठी सभागृहात दावा करण्याची गरज नाही.

    गटनेता बदलण्याची खेळी ते शिवसेनेवर उलटवतील. कारण निवडून आलेल्या आमदारांना बहुमताने गटनेता निवडून देण्याचा अधिकार असतो. शिंदे गट आमचा आघाडी सरकारला पाठिंबा नाही, असे पत्र राज्यपालांना देईल, तेव्हा राज्यपाल हे विद्यमान ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचे आदेश देतील. जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले तर शिंदेंच्या गटाच्या किमान ३७ आमदारांना सरकारविरोधात मतदान करावे लागेल. जर कमी आमदारांनी सरकारविरोधात मतदान केले तर शिवसेना पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिंदे गटाच्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करतील. त्यामुळे जोपर्यंत शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ३७ आमदार येत नाहीत, तोपर्यंत त्यांचे पत्र राज्यपालांकडे पाठविणार नाहीत, असे तज्ञांचे मत आहे.

     

    eknathshinde
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.