शासनाच्या विविध योजनांपासून शेतकरी वंचित – दीपक ढोले

0
25
मलकापूर सतीश ढांगे 
शेतकर्यांचे जिवनमान उंचावण्याकरिता प्रत्येक सरकार विविध प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणते. त्या योजनांवर प्रत्येक सरकारचा शेतकरी बांधवांसाठी खर्च कमी, अन् जाहिरातीच जास्त दिसतात. पण प्रत्यक्षात या शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा कमि अन् मनस्तापच अधिक असल्याच्या वाईट अनुभव आहे.त्यातिलच एका शेतकरी बांधवाकरीता राबविली जाणारी शेतकरी सिंचन योजना .या योजनेद्वारे शेतकरी बांधवांना सिंचनासाठी व सिंचनावर आथारीत उपाय योजनांसाठी .शेतकरी बांधवांना मदत केली जाते.पण ही मदत कोटी गरजु शेतकऱ्यानं पर्यंत पोहचत असेल याबाबत तरी एक शेतकरी म्हणुन आज तरी शंकांच येत आहे.नानाजी देशमुख योजना शेती सिंचनाच्या सोई पासुन तर फळबागे पर्यंतच्या सर्व सुविधा शेतकरी बांधवांना अनुदानाच्या माध्यमातुन पुरविते. पोखरा ही योजना एका गावात फक्त पाच वर्षांकरीता कार्य करित असते” खरंच सर्व शेतकरी बांधवांकरिता वरदान असनारी ही योजना असुन, ज्या शेत शिवार ,तालुका , ज्या जिल्ह्यात असेल. राबविल्या गेली तर ,खरंच तिथे नंदनवन होईल अशिच आहे.आज माझ्या तालुका शिवारात ,पोखरा चालु असुनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही आज जिल्ह्यात मागिल 2014पासुन सिंचन विहिरींचा कोठाच कमि करुन. 2021 मधे अचानक जिल्ह्यातिल एकुण 90 गावे सिंचन विहीरींपासुन ,शासनाच्या एका झोपलेल्या भुजल विभागाने कधि काळी टेबलावरच केलेल्या सर्व्हेने गहाळच करुन टाकली.त्या विभागानेच माझ्या जिल्यातिल 90गावात सार्थकी ठरविल्या आहेत .त्या ह्या अशा आहेत नविन म्हणी ‘अडच नाही तं पोहरा कुठुनं ” हि स्थिती आज फक्त एका बुलढाणा जिल्ह्याची नसुन, संपुर्ण महाराष्ट्रातिल सर्वच जिल्ह्यात. तालुक्यात ,गावा ,गावात, शिवारात, असु शकते ही बाब सर्व शेतकरी बंधूंनी शासनाच्या लक्षात आणून द्यावी व शासनाने याची शहानिहसा करून सरकार पर्यंत ही शेतकऱ्यांची व्यथा पोहोचवावी करिता शेतकरी  दीपक ढोले नांदुरा तहसीलदार,गटविकास अधिकारी व आ.राजेश एकडे यांना निवेदन दिले.यावेळी  शेतकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here