जळगाव प्रतिनिधी
शाळा प्रारंभ दिनाचे औचित्य साधून, विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर ,येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.
गेटवर विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, रंगीत फुगे तसेच शालेय आवारात विद्यार्थ्यांना साठी सेल्फी पॉइंट तयार करून आकर्षक पद्धतीने सजावट केलेली होती.
यावेळी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी प्रत्येक वर्गाला एक झाड भेट देऊन त्याची लागवड आणि देखभाल, संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक वर्गाला दिली. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका वैशाली पाटील, जयश्री वंडोळे यांचे व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.