चाळीसगांव-प्रतिनिधी
शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी केडगाव ता.दौंड येथील एक मित्र एक वृक्ष ही संस्था वृक्षसंवर्धनावर आधारित स्पर्धेचे आयोजन करत असते, याच धर्तीवर जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे सन २०२० पासून हरित चाळीसगांव चषक या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठीच्या ह्या दोन्हीही स्पर्धांना विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुलांना स्थानिक झाडांची माहिती व्हावी, झाडांचे फायदे समजावे यासाठी आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. विद्यार्थ्याच्या झाडाची सर्वांगीण वाढ विचारात घेऊनच त्यांना बक्षीस दिले जाईल. ह्यावर्षी दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
हरित चाळीसगांव चषक स्पर्धेची बक्षीसे खालील प्रमाणे????
लहान गट: १ ली ते ५ वी
प्रथम:-
कै.डॉ. ज्ञानेश चवात, अमरावती यांच्या स्मरणार्थ
हरित चाळीसगांव चषक ट्रॉफी, २००० रु. रोख व प्रमाणपत्र
द्वितीय:- (दोन बक्षिसे)
कै.सौ. रत्नाबाई जगन्नाथ मालपुरे, वाघळी यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, १००० रु. रोख व प्रमाणपत्र
तृतीय:- (तीन बक्षिसे)
कै. उदयसिंग मोहनसिंग शिसोदे, कुंझर यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, ५०० रु. रोख व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ:- (चार बक्षिसे)
कै. सत्यवान दगडू जाधव, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी व प्रमाणपत्र
मोठा गट: ६ वी ते १० वी
प्रथम:-
लोकनायक स्व. तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
हरित चाळीसगांव चषक ट्रॉफी, २००० रु. रोख व प्रमाणपत्र
द्वितीय:- (दोन बक्षिसे)
कै. दादासाहेब गोविंदराव मोहनराव भालेराव, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, १००० रु. रोख व प्रमाणपत्र
तृतीय:- (तीन बक्षिसे)
कै. सत्यनारायण गोवर्धन दायमा सर, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी, ५०० रु. रोख व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ:- (चार बक्षिसे)
कै. राजेंद्र सोमनाथआप्पा रुईकर (बापु रुईकर), चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ
ट्रॉफी व प्रमाणपत्र
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
हरित चाळीसगांव चषक स्पर्धेचे नियम:-
१) या स्पर्धेसाठी फक्त देशी झाडेच लावावी लागतील.
२) या स्पर्धेत जास्तीत जास्त दोन फुटांपर्यंत झाडे लावावीत.
३) विद्यार्थी झाडा शेजारी उभा करून नोटकॅम हे ऍप्लिकेशन वापरूनच लोकेशन सहितच फोटो पाठवावा.
४) फोटोसोबत त्या विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, शाळेचे नाव, इयत्ता, त्याने लावलेल्या देशी झाडाचे नाव व ठिकाण नमूद करावे.
५) शक्यतो लावलेल्या झाडाविषयीची थोडी माहिती विद्यार्थ्याने स्वहस्ताक्षरात लिहून त्याचाही फोटो पोस्टमध्ये टाकावा.
६) निकालासाठी १५ एप्रिल २०२३ ते १५ मे २०२३ यादरम्यान पुन्हा झाडाचा लोकेशन सहित फोटो पाठवावा लागेल.
७) झाड लावतानाचा फोटो ज्या ठिकाणावरून काढलेला असेल त्याच ठिकाणावरून निकालासाठीचा फोटोही काढायचा आहे.
८) आपण ही झाडे कोठे पण लावावीत आपल्या अंगणात, शेतात, डोंगरावर, शाळेत आपल्याला योग्य वाटेल तिथे.
९) ही स्पर्धा फक्त पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
१०) स्पर्धेसाठी फक्त चाळीसगांव तालुक्यातीलच विद्यार्थी पात्र असतील.
११) झाडाची सर्वांगीण वाढ पाहूनच बक्षीस दिले जाईल व त्याबाबतीत परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१२) स्पर्धेसंदर्भातील इतर सर्व सूचनांची माहिती वेळोवेळी हरित चाळीसगांव चषक या फेसबुक ग्रुपवर व जलमित्र परिवार चाळीसगांव या फेसबुक पेजवर दिली जाईल.
१३) हरित चाळीसगांव चषक व हरित महाराष्ट्र चषक या दोन्हीही स्पर्धांसाठी एकच झाड लावायचे आहे.
१४) हरित महाराष्ट्र चषक या स्पर्धेचे बक्षीस, नियम व अटी ही सर्व माहिती एक मित्र एक वृक्ष ह्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांनी झाडासोबत काढलेला फोटो व ईतर सर्व माहिती:
१) हरित चाळीसगांव चषक साठी
https://www.facebook.com/groups/GreenChalisgaonTrophy/
या फेसबुक ग्रुपवर
व
२) हरित महाराष्ट्र चषक साठी
https://www.facebook.com/groups/3334465709898851/
या फेसबुक ग्रुप वर शेअर करावेत…
स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ ही आहे.
स्पर्धेचा उद्देश केवळ वृक्षसंवर्धनाला चालना देणे हाच आहे. स्पर्धेसाठी जलमित्र परिवाराला एक मित्र एक वृक्ष ग्रुप, सामाजिक वनीकरण विभाग, कळंत्री विद्यालय, लोकनायक स्व. तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ, किमया ग्रुप, लोकउद्धार फाउंडेशन, सेवा सहयोग संस्था, सिड्स बॉल कॅम्पेन चाळीसगांव ग्रुप या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभलंय, तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी स्पर्धेत सहभागी होत आपला चाळीसगांव तालुका हिरवागार व पर्यावरण समृद्ध करावा असे आवाहन जलमित्र परिवारातर्फे करण्यात आलंय.