जळगाव : प्रतिनिधी
शहरातील हरिविठ्ठल नगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हरिविठ्ठल नगरातील अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह वास्तव्यास आहे. जेवण झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजता कुटुंबीय झोपून गेले होते. बुधवारी पहाटे अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जाग आल्यानंतर त्यांना मुलगी झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही. त्यांनी इतर भागांमध्ये तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.