शरद पवारांच्या घरावर हल्ला : पुण्यात पत्रकाराला अटक, मुंबईत आणले

0
8

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनप्रकरणी पुण्यात एका पत्रकाराला अटक करण्यात आली. चौकशीसाठी आज दुपारी त्याला मुंबईमध्ये आणले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आतापर्यंत ११५ जणांना अटक करण्यात आली असून एकूण १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘एमजेटी मराठी न्यूज’ हे यू-ट्युब चॅनल चालविणारा पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

याच प्रकरणामध्ये ११ एप्रिल रोजी वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आहे. आंदोलनाच्या दिवशी सदावर्ते हे नागपूर येथील एका व्यक्तीच्या संपर्कात होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत, असे सरकारी पक्षाने सांगितले आहे. या प्रकरणात पत्रकाराला अटक झाल्याने या प्रकरणातील बरीच नवीन माहिती उघड होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here