व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या भावात ९१.५० रुपयांने कमी

0
9

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आजच्या अर्थसंकल्पापूर्वीच सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी झाली आहे.

आज(मंगळवार) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर १९०७ रुपयांचा झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी कपात केली होती, मात्र सिलिंडरची किंमत २००० रुपयांपेक्षा जास्त होती.

आज (१ फेब्रुवारी) सकाळी दिल्लीत विना सबसिडीवाल्या १४.२ किलोच्या इंडेन गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये गॅस सिलेंडरची किंमत ९२६ रुपये आहे. मुंबईत, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत सध्या ९१५.५० रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here