व्यवसायिक पाणीपुरवठ्यामुळे आणि पोलिसांमध्ये कारवाईची हिंमत नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा (व्हिडिओ)

0
41

यावल (सुरेश पाटील)

यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या व्यापारी संकुलना समोर म्हणजे यावल एसटीस्टँड पासून तर यावल पोलीस स्टेशन समोरील अंतरावर आणि बुरुज चौकापासून तर बोरावल गेटपर्यंत तसेच सुदर्शन चित्रमंदिर चौकात बेशिस्तपणे चारचाकी दुचाकी वाहनांसह अतिक्रमित दुकाने,हाथगाड्यावर व्यवसाय करणाऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,यात यावल पोलीस मात्र मद्यप्राशन करणाऱ्या एका होमगार्ड सोबत आणि त्याच्या सल्ल्यानुसार100वाहनांपैकी फक्त एका वाहनधारकांवर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी,दमदाटी देऊन कारवाईचा देखावा करीत असल्याने आणि 95 टक्के वाहनधारकांना कारवाई न करता सोडून दिले जात असल्याने पोलिसांमध्ये कारवाई करण्याची हिंमत राहिलेली नाही असे संपूर्ण यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.

यावल टी पॉईंट जवळ सुपर शॉप दुकाना समोर खाजगी व्यवसाइक पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने त्या ठिकाणी कॅनमध्ये पाणी भरण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर भररस्त्यावर उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.हे वाहतूक नियंत्रक पोलिसांना दिसत नाही का?यावल शहरात दर आठवड्याला शुक्रवार रोजी आठवडे बाजार चक्क दोन ठिकाणी म्हणजे आठवडे बाजाराच्या जागेवर आणि बोरावल दरवाजा पासून म्हसोबा देवस्थान पर्यंत भरत असतो याकडे यावल नगरपरिषद आणि पोलिसांचे संयुक्तपणे दुर्लक्ष का आणि कशासाठी?बुरुज चौकापासून तर गवत बाजार पर्यंत बेशिस्त वाहनांची आणि किरकोळ दुकानदारांच्या अनधिकृत अतिक्रमण आणि वर्दळीमुळे वाहतुकीस आणि पायलट चालणाऱ्या स्त्री-पुरुषांना मोठा अडथळा निर्माण होत असतो बऱ्याच वेळेला वाहतूक ट्राफिक जाम होत असते, किरकोळ भांडण तंटे होत असतात यामुळे यावल शहराची कायदा-सुव्यवस्था शांतता आणि जातीय सलोख्याला गालबोट लागण्याची किंवा अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

हे यावल पोलीस आणि यावल नगरपरिषद यांना दिसून येत नाही,यावल पोलीस स्टेशन हद्दीत अनेक प्रकारच्या वाहनांचे आयुर्मान संपले आहे, प्रवासी वाहन मध्ये कोंबड्या आणि बकऱ्या प्रमाणे मानवी प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे परंतु मासिक हप्ते बाजीमुळे पोलिसांमध्ये कारवाई करण्याची हिंमत राहिलेली नाही कारण यावल शहरात अनेक दुचाकी चारचाकी वाहनांवर कायद्याची पायमल्ली करून नंबर प्लेट वर नियमानुसार वाहनांवर वाहन क्रमांक नमूद केलेले नाहीत काही वाहनांच्या नंबर प्लेट वरती तर वाहन क्रमांक ऐवजी दुसरे वैयक्तिक चिन्ह किंवा नाव प्रत्यक्ष असताना यावल पोलिसांनी त्यांच्यावर आतापर्यंत काय कारवाई केली?किंवा श्रीमंत, धनाढ्य,दोन नंबरचे व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध किंवा परिचित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची हिम्मत/धाडस संबंधित त्या एका वाहतूक नियंत्रक पोलीसाकड़े किंवा ठराविक त्या एक-दोन होमगार्डकड़े नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात असून तसेच दि.7रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकलना समोर अंदाजे शंभर मोटरसायकली आणि काही चार चाकी वाहने अनधिकृतपणे पार्किंग केलेली असताना व्यापारी संकुलनातील एका व्यापार्‍याची तथा पत्रकाराची मोटरसायकल पोलीस स्टेशनला नेऊन त्या पत्रकाराला आणि व्यापाऱ्याला एखाद्या अट्टल गुन्हेगाराची वागणूक देण्यात आली.ही कारवाई करताना यावल पोलिसांनी मात्र पक्षपातीपणाची कारवाई करून इतर वाहनधारकांवर कारवाई न करता फक्त एका पत्रकारावर कारवाई का केली हा आता प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना संशोधनाचा विषय झाला आहे.

यावल पोलीस स्टेशन हद्दीत सट्टा,पत्ता,क्लब,गांजा,अफू पन्नीची दारू,हातभट्टीची दारू, बनावट दारू,गुटखा विक्री,घरगुती वापराचा गॅस अनधिकृतपणे वाहनांमध्ये भरून वाहतूक करणारी वाहने,रेशनिंग दुकानातील धान्य इतर अवैध धंदे,अवैध वाहतूक अवैध गुराढोरांची वाहतूक गौण खनिज वाहतूक करणारे डंपर,ट्रॅक्टर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानासुद्धा सुसाट वेगाने धावत आहेत ही पोलिसांना दिसत नाही का?पोलीस उपविभागीय अधिकारी,गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावल पोलीस स्टेशन हद्दीत येऊन अवैध धंदे चालकांवर कारवाई करतात? हे यावल पोलिसांना एक मोठे आव्हान आहे.

परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अशित कांबळे यांनी यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात एकाच ठिकाणी एकाच प्रकारची आणि तेही ठराविक कामे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची खांदेपालट करून इतर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील नागरिकांमधील झालेले गैरसमज दुर होऊन पोलिसांविषयीचा आदर कायम राहील अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here