जळगाव : प्रतिनिधी
येथील ओरीएन इंग्लिशन मेडियम स्कूलमधी विद्यार्थीनी वेदश्री नितीन झोपे हिने दहावी परीक्षेत 94.60 टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळविले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वेदश्री झोपे हिला गणित व सायन्स या विषयांची विशेष आवड असून तिने डिप्लोमा करण्याचे ठरविले आहे. तिला प्राचार्य ब्रुस ॲडरसन शिक्षक निलेश पाटीलल शिक्षिका सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
वेदश्रीचे वडील नितीन झोपे हे ए.टी. झांबरे विद्यालयात तर आई वैशाली झोपे या नंदिनीबाई विद्यालयात शिक्षिका आहेत. तिला आई वडिलांचे देखील मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.