जळगाव : प्रतिनिधी
“ वृक्ष लागवडीला आर्थिक व सामाजिक विकासाशी सांगड घालून लोक चळवळीचे रुप देऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे काळाची काळाची नितांत गरज आहे “ असे कळकळीचे आवाहन हरीत शिक्षक पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र विजय लुल्हे यांनी केले.राष्ट्रीय वृक्ष दिनानिमित्त बुद्ध जयंतीच्या पर्वात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लुल्हे बोलत होते.
वृक्षारोपण जळगाव येथे चंदु अण्णा नगर पुढील सद्गुरु बैठक सभागृह परिसरात दिनांक 16 मे रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी अथर्व प्रकाशनाचे प्रकाशक युवराज माळी होते.पुढील मार्गदर्शनात लुल्हे यांनी सण उत्सवात वृक्षवेलींचे धार्मिक महत्व सांगून परसबागेत लागवडयुक्त औषधी वनस्पतींची संक्षेपाने माहिती दिली. पेरु, सिताफळ, जामुन या प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण निवृत्त ए.पी.आय.आर.आर मराठे, निवृत्त पी.एस.आय.सुरेंद्र काळे निवृत्त ए.एस.आय कैलास जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते न्हानू दाभाडे, भारतरत्न डॉ.कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे , देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कला शिक्षक सुनिल दाभाडे आदिंच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात अथर्व प्रकाशनाचे प्रकाशक युवराज माळी म्हणाले,“ जैव विविधतेचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण प्रत्येक नागरीकाने उत्स्फूतपणे आद्य कर्तव्य समजून केले पाहिजे मी किमान एक तरी झाड लावीन व ते जगवीन अशी प्रतिज्ञा कला शिक्षक सुनिल दाभाडे यांनी सर्व उपस्थित पर्यावरणप्रेमींकडून म्हणून घेतली.
कार्यक्रमास निवृत्त शिक्षण उपसंचालक शाशिकांत हिंगोणेकर,निवृत्त माध्यमिक उप शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, पत्रकार दीपक महाले यांनी अमूल्य सहकार्य केले.परिसरातील एस.टी.वाहक भगवान कुमावत,हिरामण बाविस्कर ,नाना कुमावत यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते.सुत्र संचालन व आभार प्रदर्शन सुनिल दाभाडे यांनी केले.