विवेकानंद विद्यालयातर्फे ‘आभाळाचं दान’ कार्यक्रमातून ना. धों.महानोरांना आदरांजली

0
12

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

दिवंगत कविवर्य ना.धों.महानोर यांना श्रद्धांजलीपर ‌‘आभाळाचं दान अर्थात पाऊसगान’ या पावसाच्या संकलित कवितांचा कार्यक्रम विवेकानंद विद्यालयात आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विलास पाटील, खेडीभोकरीकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी) उपस्थित होते. सुरुवातीला कवी महानोरांच्या रेखाचित्राचे पूजन करण्यात येऊन त्यांचा जीवन परिचय उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी केला. यावेळी रानकवी स्व.ना. धों.महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पावसाच्या संकलित कविता आणि काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे अतिशय सुंदर गायन व अभिवाचन सादर केले.

कविता सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रांजल सानप, नक्षत्रा सोनवणे, आर्यदीप पाटील, मनाली पाटील, जान्हवी चौधरी, प्रियंका भोई, आरोही पाटील, अनुष्का शिंदे, कल्याणी पाटील, प्रांजल पाटील, मुक्ता पाटील, रोहन पाटील, वैष्णवी पाटील, दीक्षा देशमुख, स्वरा हरताळकर, साक्षी रायसिंग, आर्या जोशी, सात्विक माळी, जैनब तडवी, श्रुती देशमुख, प्रेरणा महाले यांचा समावेश होता. तसेच प्रसाद वैद्य यांनी ‘पाऊस’ ही स्वरचित कविता सादर केली.

पावसावर आधारित चित्र रेखाटून रंगविले…!
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास पाटील यांनी आपल्या संकलित आणि दिलखुलास पाऊस कविता सादरीकरणातून विद्यार्थ्यांना चिंब भिजविले. दिवंगत कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ‘चिंब पावसानं रानं झालं आबादानी….’चा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. सादरीकरणावेळी विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या मार्गदर्शनाने पावसावर आधारित चित्र रेखाटून रंगविले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी विलास पाटील यांचे आभार मानून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विलास पाटील यांचा परिचय राधेश्याम पाटील यांनी करुन दिला. यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र भावे, पवन लाठी यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते. उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर यांच्यासह सर्व विश्वस्त, पालकांनी कौतुक केले आहे. यशस्वीतेसाठी सर्व मराठी अध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्मृती माळी, जितेंद्र देवरे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here