विविध गुन्ह्यातील वारंट मधील सहा आरोपींना अटक…सोयगाव पोलिसांची धडक कारवाई

0
19

साईमत लाईव्ह  सोयगाव तालुका प्रतिनिधी

विविध गुन्ह्यातील वारंट मधील सहा आरोपींना गुरुवारी भल्या पहाटे झोपेतुनच उठवून अटक करण्याची कारवाई सोयगाव पोलिसांनी केली आहे.विविध गुन्ह्यातील पाच वारंट मधील सहा आरोपींना अटक करून सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यातील एकाची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरंडी,निंबायती आणि माळेगाव,पिंप्री या चार गावातील विविध गुन्ह्यातील वारंट मधील सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सोयगाव पोलिसांना यश आले असून त्यापैकी एकाला हर्सूलला रवानगी करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश पंडित,जमादार राजू बर्डे,ज्ञानेश्वर सरताळे,रवींद्र तायडे,गणेश रोकडे,महिला शिपाई भाग्यश्री चव्हाण आदींच्या पथकाने हि धडक कारवाई केली आहे.

बनोटी चोरी प्रकरणी तिघांची हर्सूलला रवानगी

बनोटी ता.सोयगाव येथील दुकानातील चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजय चव्हाण,गौतम सोनवणे,आणि आकाश बोरसे यांना गुरुवारी दुसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर केले असता या तिघांची हर्सूलला रवानगी करण्यात आली असून त्यांनी दुकान फोडून लंपास केलेल्या मुद्देमालातून १६ हजार ६५० रु चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.या पराकारणी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,उपनिरीक्षक सतीश पंडित,राजू बर्डे,सादिक तडवी,अजय कोळी,आदी पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here