विवाह होत नसल्याचा मानसिकंतेतून युवकाचा गळफास

0
69

जळगाव : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट होते ते आता संपले परंतु कोरोना काळात लॉकडाउन झाले होते. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले तसेच लॉकडाउन काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते फक्त सरकारी नोकरदारांना पगार सुरु होते त्यामुळे आता लग्न करण्यासाठी वधू पित्याची शासकीय नोकरदारास अधिक प्राधान्य दिले जाते. यामुळे शेतमजून व रोजदारी करणाऱया युवकांना मात्र विवाह होण्यास खूप वेळ लगत आहे. त्यामुळे युवकांना मानसिक त्रास होत असल्याने काही युवक जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेताना समजून येत आहे.
तालुक्यातील नशिराबाद येथे एका ३० वर्षीय तरुणाने विवाह होत नसल्या कारणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतन खरोटे (वय 30) असं या तरुणाचं नाव आहे.चेतन खरोटे हा कुटुंबियांसह नशिराबाद येथे वास्तव्यास आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी चेतन खरोटे हा त्याच्या आईला वारंवार लग्न होत नसल्याचा तगादा लावीत होता. याच विवंचनेत असलेला चेतन गेल्या तीन दिवसांपासून व्यसनाच्या ही जास्त आहारी गेला होता. यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. ही संधी साधत चेतनने घर आतून बंद करून घेतले आणि घराच्या छतावरील कडी-कोयंड्याला दोरी बांधून आपली जीवन यात्रा संपवली.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. लग्न होत नसल्यामुळे चेतनने पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here