विवाहितेचा दोन लाख‎ रुपयांसाठी छळ; पाच‎ जणांविरुद्ध गुन्हा दाखल‎

0
89

प्रतिनिधी । धरणगाव‎ वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख‎ रुपये आणावे, या मागणीसाठी‎ विवाहितेचा शारीरिक आणि‎ मानसिक छळ केल्याप्रकरणी पती,‎ सासू-सासरे, जेठ आणि दीर अशा‎ पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ सपना अनिल मोहिते (रा.‎ माणिक नगर मारोती मंदिराजवळ‎ सिल्लोड, जि. औरंगाबाद, ह.मु.‎ बोरगाव खु. ता. धरणगाव) यांनी‎ फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. २०‎ ऑगस्ट २०२१ ते दि. २१ मार्च २०२२‎ रोजी दरम्यान विवाहितेने‎ वडिलांकडून गाडी घेण्यासाठी दोन‎ लाख रुपये आणावे, यासाठी‎ संशयित पती- अनिल मनोहर‎ मोहिते, सासरे- मनोहर आसाराम‎ मोहिते, सासू-मिराबाई मनोहर‎ मोहिते, जेठाणी-अरुणा अशोक‎ मोहिते, जेठ-अशोक मनोहर मोहिते,‎ दिर-सुनिल मनोहर मोहिते यांनी‎ छळ केला. विवाहितेस तू घरातील‎ कामे करीत नाही. तसेच पती अनिल‎ मोहिते याने विवाहितेच्या चारित्र्यावर‎ संशय घेवून दारु पिऊन मारहाण‎ शिवीगाळ करुन शारिरिक व‎ मानसिक छळ केला. याप्रकरणी‎ पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल‎ झाल्याने खळबळ उडाली आहे.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here