जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील एकाच्या घरी रात्री हल्ला झाल्याची घटना रात्री 2.30 वाजेच्या सुमारास घडली. मात्र या हल्ल्यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. तर दोन दुचाकी वाहनाची मात्र तोडफोड करण्यात आली असल्याची समजते. सकाळी रामानंद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील महाबळ परिसराला लागून असलेल्या जाकीर हुसैन कॉलनी राहणाऱ्या नलिनी विलास तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यांच्या राहत्या घरी जाकीर हुसैन कॉलनीत रात्री आबा व अश्विन (पूर्ण नाव माहित नाही) हे घराबाहेर येवून त्यांची मुले विनोद व सतिष यांच्या नावाने शिवीगाळ करून व जीवेठार मारण्याची धमकी देत घराबाहेर असलेल्या बुलेट क्र.एम.एच.19.डी.एच.0041 यासोबत एक दुचाकी फोडण्यात आली आहे. याबाबत दि.27 रोजी सकाळी फिर्यादी नलिनी तायडे यांनी रामानंद पोलिस स्थानक गाठून येथे दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.