मुंबई : प्रतिनिधी
आज सकाळी ९ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. एक एक करून आमदार मतदान करत आहे. आतापर्यंत जवळपास भाजपच्या (BJP) सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आत केवळ लक्ष्मण जगताप आणि सुधीर मुनगंटीवार यांचे मतदान बाकी आहे. ते दुपारी मतदान करणार आहे.
विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी मतदान सुरू आहे. आतापर्यंत भाजपच्या १०४ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या सत्रातच भाजपच्या आमदारांना मतदान करण्याची सूचना केली होती. त्यानंतर भाजप आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आत सुधीर मुंनगंटीवार आणि लक्ष्मण जगताप देखील मतदानासाठी निघाले आहेत ते दुपारच्या सत्रात मतदान करणार आहे. एकूण १०६ आमदारांचे मतदान दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे.